Friday, October 11, 2024
Homeगुन्हेगारीअकोला मलकापूरात राडा ! रस्त्यावर केक कटिंगच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला ;...

अकोला मलकापूरात राडा ! रस्त्यावर केक कटिंगच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला ; पाच जखमी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अलीकडे वाढदिवस रस्त्यावरच साजरा करणे. एवढेच नाही तर तलवार किंवा धारधार चाकूने केक कापून मोठया आवाजात गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे फॅशन वाढत असून,काल रविवार रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान मलकापूर येथे वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद होवून मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्या पाचजणांपैकी एका युवकावर आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात येथे करण्यात आले.

खदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्राणघातक हल्ल्यातील घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा पर्यंत खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत.

काल रविवार 3 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास मलकापूर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना नागरिकांनी थांबविले. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत होवून प्राणघातक हल्ले झाले. यानंतर यातील काही युवकांनी मलकापूर येथील नागरिकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला.घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सुभाष दुधगावकर, खदान पोलिसांचे एसएचओ धनंजय सायरे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. यांनतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान गंभीर जखमी युवकाला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेत शुभम शांताराम वानखडे 28, अमित सुनील गोपनारायण 29, राजू प्रभाकर गोपनारायण 36, पवन मोहन गोपनारायण 27, हीरा कांबळे जखमी झाले आहेत.

खदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्राणघातक हल्ल्यातील घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा पर्यंत खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत. दरम्यान ही घटना जुन्या वादातून घडल्याचेही बोलल्या जात आहे.रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या युवक युवतीना नागरिकांनी हटकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालतात. अकोला पोलिसांनी यावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात याहूनही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!