Saturday, December 14, 2024
Homeसंपादकियकोण होतास तू,काय झालास तू ! उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र तिसरा

कोण होतास तू,काय झालास तू ! उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र तिसरा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशातील मुलींच्या लिंग गुणोत्तरातील घट थांबवणे आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एकीकडे, प्रधानमंत्री मातृ वंदना, बेटी बचाओं- बेटी पढाओ, पी.एम स्वनिधी, महिला समृद्धी कर्ज, विधवा पेन्शन, सुकन्या समृद्धी, जननी सुरक्षा, माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी, महिला शक्ती केंद्र, मोफत शिलाई मशीन इत्यादी अनेक योजना राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे मात्र महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.उत्तर प्रदेश व राजस्थान यात सर्वात आघाडीवर असले तरी, या खालोखाल महाराष्ट्रचा क्रमांक लागतो.हे विसरता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार चढत्या क्रमाने असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NRCB) अहवालातून समोर आली.

महिलांच्या शारीरिक व मानसिक शोषणाचे प्रमाण असेच चढत्या क्रमाने वाढत असेल तर, या योजनांचा फायदा किती व कोणाला? महिला सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांचा जरब काय, या प्रश्नांसह देशातील महिलांच्या जीवीत व शारीरिक सुरक्षेचे काय? भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडून चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत.पण देशात महिलांवरील अत्याचारांचे खटले उत्तर प्रदेशात झाले आहेत.

देशभरात २०२२मध्ये महिलांवरील अत्याचाराचे चार लाख २८ हजार २७८ गुन्हे दाखल झाले होते. यात उत्तर प्रदेश व राजस्थानंतर महाराष्ट्रात २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३९ हजार ५२६ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर शहरात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना पळवून नेण्याचे गुन्हे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. महिला, मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण करण्याचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात महिलांचे अपहरण केल्याप्रकरणी ७ हजार ५५९ गुन्हे दाखल आहेत.

बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे राजस्थानात झाले आहेत.तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.बलात्काराचे राजस्थानात २०२२ मध्ये ६ हजार ३३७ गुन्हे दाखल झाले. मध्य प्रदेश अणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे दोन हजार ९४७ आणि दोन हजार गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्रात दोन हजार ४९६ गुन्हे दाखल झाले होते. प्रमुख महानगरांचा विचार केल्यास दिल्लीत एक हजार २२६ गुन्हे दाखल झाले होते. जयपुर आणि मुंबईत अनुक्रमे ५०२ आणि ३६४ गुन्हे दाखल झाले होते. सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) अहवालातून समोर आलेल्या या धक्कादायक माहितीला वाचल्यावर, कायद्याचे कोठे !

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षीशाहू महाराज, महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरसह थोर समाज सुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल होतात. कौटुंबिक वाद, माहेरहून पैसे आणण्याची मागणी तसेच चारित्र्याचा संशय घेऊन छळ केला जातो. या छळामुळे महिला आत्महत्या करतात. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाइकांसह परिचितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. २०२२ मध्ये महाराष्ट्रात ९२७ गुन्हे दाखल झाले होते. मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ७५८ आणि ४५६ गुन्हे दाखल झाले. अनेक प्रकरणांची तडजोड केली जाते. काही प्रकरणे पोलिस स्टेशनमध्ये पोहचत नाही. पोहचले तर नोंद होत नाही. ती संख्या यापेक्षा दुप्पट आहे. तेव्हा खरोखरच आम्ही सुज्ञानी आहेत !

  • मागील चार वर्षांतील NCRB च्या अहवालातून बलात्कार व यौनशोषण जणू संसर्गजन्य आजार होतो की काय, असे चित्र निर्माण होत आहे. महाराष्ट्रात १८ वर्षपेक्षा कमी वयाच्या मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचे प्रमाण चिंताजनक असताना, १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींवरील दुष्कर्मात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यौन शोषणाची पहिली घटना मुजफ्फरपूर व देवरीया येथे जुलै २००७ मध्ये घडली होती. आज १६ वर्षानंतर यौन शोषणाचे प्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे.एवढी विदारक परिस्थिती आज उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असून, ‘मासूम की मासूमियत से भी खेल रही हैं दुनिया, जंगली जानवर की तरह झंझोड़ रही है दुनिया। इंसानियतपर कोई विश्वास नहीं रह गया ! आज आदिमानव से ज्यादा विचारहीन मानव हो गया। कोण होतास तू काय झालास तू,…..
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!