Saturday, June 22, 2024
HomeUncategorizedपठाण, जवाननंतर आता शाहरुख खानच्या 'डंकी';ची हवा; धमाकेदार टीझर रिलीज

पठाण, जवाननंतर आता शाहरुख खानच्या ‘डंकी’;ची हवा; धमाकेदार टीझर रिलीज

बॉलिवूडच्या किंग खानचा यावर्षीचा धमाकेदार तिसरा सिनेमा ‘डंकी: ड्रॉप ४’ ट्रेलर रिलीज झाला आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या कथाकार आणि दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. या चित्रपटात शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ पेक्षा वेगळा दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू, बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळतील.

आज ५ डिसेंबर रोजी ‘डंकी ड्रॉप ४’ चा ट्रेलर रिलीज झाला, या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात १९९५ च्या काळापासून सुरु होते. राजकुमार हिरानी यांच्या सुंदर दुनियेची खास झलक या ट्रेलरमध्ये आहे. ट्रेनमधील दृश्यांत शाहरुखची पहिली झलक त्याच्या ‘दिलवाले दिलहनिया ले जायेंगे’ या चित्रपटाची आठवण करून देते. चित्रपटाला एक उत्तम ओपनिंग आहे जी येणार्‍या रोमांचाचे वातावरण निर्मित करते. ३ मिनिट २१ सेकंदाचा व्हिडिओ हार्डी उर्फ शाहरुख खानपासून सुरू होणार्‍या हृदयस्पर्शी पात्रांची ओळख करून देतो. तो पंजाबमधील लाल्टू या सुंदर गावात जातो आणि मनू, सुखी, बग्गू आणि बल्ली यांसारख्या काही मित्रांना भेटतो. त्या सर्वांचे एकच स्वप्न असते… ते म्हणजे लंडनला जायचे, चांगल्या संधी शोधायच्या आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायचे.

‘डंकी’च्या या रंजक कथेत, सर्व भिन्न पात्रे आणि भावना एका फ्रेममध्ये सुंदरपणे टिपल्या गेल्या आहेत, चार मित्रांच्या अद्भुत प्रवासाचा एक भाग आहे. या ट्रेलरमध्ये काही साध्या मनाच्या लोकांची सीमेपलीकडे जाणाऱ्यांची कथा आहे, जी त्यांना अवघड वाटेवरून घेऊन जाते. चित्रपटाच्या ३ मिनिट २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये परदेशात जाण्याची इच्छा त्यांना हातात बंदूक घेण्यास कशी भाग पाडते याची जबरदस्त झलक पाहायला मिळते.

हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित

या डिसेंबरमध्ये ‘डंकी’ सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज आहे. जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत ‘डंकी’ची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेला हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!