अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरात जाॅय सर नावाने परिचित जॉय जान यांंचे आज बुधवार ६ डिसेंबरला वयाच्या ५८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आणि खुप मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
माऊंट कारमेल शाळेचे माजी कर्मचारी जाॅय जाॅन यांनी आपल्या हसतमुख स्वभावाने अकोला शहरात मित्रांचा मोठा गोतावळा निर्माण केला. त्यांची अंतिम यात्रा उद्या गुरुवार ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता त्यांचे राहते घर जठारपेठ, बर्फ कारखान्यासमोरून अकोला येथील क्रिश्चन स्मशानभूमी, कैलास टेकडी जवळ येथे निघेल. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.