Tuesday, June 25, 2024
Homeअर्थविषयकVITEX-2024 पश्चिम विदर्भातील उद्योग-व्यवसाय वाढीसाठी लाभदायक ठरेल

VITEX-2024 पश्चिम विदर्भातील उद्योग-व्यवसाय वाढीसाठी लाभदायक ठरेल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शतकाकडे वाटचाल व दोन हजार सदस्यांसह व ७२ वेगवेगळ्या असोसिएशशी संलग्न असलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून आयोजित तीन दिवसीय “VITEX 2024” अर्थात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ट्रेड एक्सपो ही व्यापार व उद्योगाची प्रदर्शनी पश्चिम विदर्भातील व्यापारी व उद्योजक घटकांसाठी सहाय्यक ठरणार आहे. या एक्स्पोची जोमात तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष आशीष चंदाराना, राहुल गोयनका, सचिव निरव वोरा, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव व प्रदर्शनीचे संयोजक निखिल अग्रवाल, सहसंयोजक राहुल मित्तल आदी उपस्थित होते. नववर्षात दि 5 ते 7 जानेवारी पर्यंत स्थानीय गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षण संस्थानच्या मैदानात नित्य सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनीत पश्चिम विदर्भातील तब्बल दीडशेहुंन अधिक स्टॉल सहभागी होत असून एकाच छताखाली गृह,उद्योग, औद्योगिक, कृषी, बांधकाम, आयटी, शिक्षण, गृहप्रकल्प आदींची माहिती व साहित्य नागरिकांसाठी या “वीटेक्स-2024” प्रदर्शनीत उपलब्ध होणार आहेत.

चेंबरच्या वतीने प्रथमच अशा आगळावेगळा उपक्रम साकार करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील लघु,मध्यम व्यापारी, उद्योजक यांना व्यापरिक प्रोत्साहन मिळावे, व्यापार, उद्योग व व्यवसायांना चालना मिळावी,त्यांच्या उत्पादनाची नवी ओळख व्हावी, त्यांचे उत्पादन साहित्य नागरिकांना बघता यावे यासाठी नववर्षात हा उपक्रम साकार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व सोयीने युक्त अश्या या प्रदर्शनीत औद्योगिक, व्यापारी व उद्योग विश्वांच्या तज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र नागरिकांना या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. चेंबर व सलग्न संस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने साकार करण्यात आलेल्या या विटेक्स प्रदर्शनीची जोमात तयारी सुरू झाली असून अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य प्रायोजक तथा भूपती बिल्डर सह प्रायोजक असून या प्रदर्शनीचे संपूर्ण इव्हेंट व्यवस्थापन औरा इव्हेन्टचे आनंद अग्रवाल व दीपक अग्रवाल करणार आहेत.

नागरिकांना या प्रदर्शनीत निरनिराळ्या स्टॉल्सला भेट दिल्यावर भव्य विरूंगळा साठी फूड झोन पण साकार करण्यात आले आहे.या झोनमध्ये चविष्ट व स्वादिष्ट व्यजनांचे प्रकार नागरिकांना चाखावयास मिळणार आहेत. दीडशेहुंन अधिक स्टॉलच्या ताफ्यासमवेत साकार करण्यात येत असणाऱ्या या प्रदर्शनीचे केवळ मोजकेच स्टॉल उपलब्ध असून पश्चिम विदर्भातील व्यापारी व उद्योजकांनी या उपक्रमाचा लाभ घेत स्टॉल नोंदणीसाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, श्रावगी टावर, तिलक रोड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रदर्शनीच्या सफलतेसाठी चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक दालमिया, वसंत बाछुका, अशोक गुप्ता, निरंजन अग्रवाल, कमलेश वोरा, रमाकांत खंडेलवाल, विजय पनपालिया, राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात

चेंबरचे अँड सुभाषसिंह ठाकूर, प्रमोद खंडेलवाल, सतीश बालचंदानी, श्रीकर सोमन, दिलीप खत्री, मनीष केडिया, सलीम अली दोडिया, सिद्धार्थ रुहाटिया, कमल खंडेलवाल, कृष्णा शर्मा, चंचल भाटी, मनोज अग्रवाल, सुधीर राठी, शैलेंद्र कागलीवाल, विजय गोयनका, रोहित खंडेलवाल, योगेश अग्रवाल, राजकुमार राजपाल, राजकुमार शर्मा, किरीट मंत्री, पंकज कोठारी, संतोष छाजेड, सज्जन अग्रवाल, अविन अग्रवाल, नितीन भारुका, रजनी महाले, अँड. धनंजय पाटील, प्रदीप मालानी, संतोष झुनझुनवाला, दिनेश पालडीवाल, श्रीकांत गोयनका, शैलेश खरोटे, शाम अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, राजेश राठी, प्रणय कोठारी, हिमांशू खंडेलवाल,अनुराग अग्रवाल,ब्रिजमोहन चितलांगे, दिपाली देशपांडे, उन्मेष मालू, नरेश अग्रवाल,नितीन बियाणी, सीए प्रशांत लोहिया, रितेश गुप्ता ,रोहित केडिया, संजय जैन, निलेश बोर्डेवाला,श्याम साधवानी, पवन माहेश्वरी, सुनील मुरारका, गोपाल टेकडीवाल समवेत सलग्न संस्थाचे पदाधिकारी प्रयत्नरत असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!