Tuesday, June 25, 2024
Homeताज्या बातम्याKGF नंतर यशचा 'टॉक्सिक' सिनेमा ! लूक पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

KGF नंतर यशचा ‘टॉक्सिक’ सिनेमा ! लूक पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : KGF आणि KGF 2 चित्रपटातून जगभरात खळबळ माजवणारा अभिनेता यश त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करत आहे. साऊथचा रॉकिंग स्टार यशचे चाहते बऱ्याच दिवसांपासून नवीन चित्रपटाची वाट पाहत होते. ज्याची प्रतीक्षा आता संपली आहे. यशने आपल्या नवीन चित्रपटाचे नाव जाहीर करण्यासोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. यशच्या नव्या चित्रपटासाठी चाहत्यांना २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या सुपरस्टारच्या चित्रपटाचे नाव आहे टॉक्सिक – अ फेरी टेल फॉर ग्रोन अप. यशने व्हिडिओ शेअर करून टॉक्सिकची घोषणा केली आहे.

व्हिडीओमध्ये पत्ते खेळणारा जोकर दिसत आहे. तसेच, व्हिडिओचे म्युझिक ऐकून यश पुन्हा एकदा पडद्यावर रॉक करण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते. चित्रपटाच्या घोषणेसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला शोधत आहे’ – रुमी. टॉक्सिकच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यशच्या चाहत्यांसह अनेक सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

टॉक्सिकचे दिग्दर्शन मूथॉन फेम गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि ते केव्हीएन प्रॉडक्शनने निर्मिती केले आहे. टॉक्सिक १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे प्रोफाईल डिस्प्ले पिक्चर बदलून ‘लोडिंग’ केले होते. टॉक्सिकमध्ये यशसोबत इतर कलाकार कोण असतील याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!