Saturday, November 9, 2024
Homeगुन्हेगारीचक्क बनावट टोल नाका ! भाजपा कनेक्शन काय ? दीड वर्षांनी समोर...

चक्क बनावट टोल नाका ! भाजपा कनेक्शन काय ? दीड वर्षांनी समोर आलं सत्य

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आतापर्यंत बनावट कागदपत्र, बनावट पुरावे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु, आता चक्क बनावट टोल प्लाझा उभारून सरकारची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि ही घटना घडली आहे महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये. तब्बल दीड वर्षांनंतर हा प्रकार उजेडात आला आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुजरातमधील बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर खासगी जमिनीवर महामार्गाला बायपास करून बनावट टोल प्लाझा उभारण्यात आला होता. या टोल प्लाझावरून काही बलाढ्य लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांची वर्षभरापासून फसवणूक केली. गुजरातमधील मोरबी येथे राष्ट्रीय महामार्गाला बगल देऊन खासगी जमिनीवर बनावट टोल प्लाझा उभारून त्यांच्या ‘टोल बूथ’वर निम्मी किंमत आकारून जनतेची, पोलिसांची आणि जिल्ह्यातील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांची दीड वर्षे फसवणूक करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गाचे अधिकृत टोल असलेल्या वघासिया टोल प्लाझाचे व्यवस्थापक म्हणाले, खाजगी जमीन मालक दीड वर्षांपासून दररोज हजारो रुपयांची खुलेआम फसवणूक करत आहेत. आरोपी व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीच्या मालकीची जमीन, बंद कारखाना आणि वर्गासिया गाव या मार्गे वाहतूक प्रत्यक्ष मार्गावरून वळवत होते.

निम्मा टोल टॅक्समुळे चालकही खुश
अर्ध्या टोल टॅक्समुळे ट्रक चालकांना मार्ग काढण्यास प्रवृत्त केले आणि वर्षभरापासून अवैध कर वसुलीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. आम्हाला माहिती मिळाली की वर्गासिया टोल प्लाझा मार्गावरून काही वाहने वळवली जात आहेत आणि टोल टॅक्स वसूल केला जात आहे. याप्रकरणी पोलीस आणि इतर अधिकारी तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना याबाबत सविस्तर माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे, असे मोरबीचे जिल्हाधिकारी जीटी पंड्या यांनी सांगितले.

भाजपा कनेक्शन काय?
फानान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अन्य चार आरोपींमध्ये रविराजसिंह झाला, हरविजयसिंह झाला, धर्मेंद्रसिंह झाला आणि धर्मेंद्रसिंह यांचा भाऊ युवराजसिंह झाला. वघासिया गावचे सरपंच धर्मेंद्रसिंह हे भाजपशासित वांकानेर तालुका पंचायतीच्या माजी अध्यक्षा रियाबा झाला यांचे पती आहेत.पोलिसांनी व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीचे मालक अमरशी पटेल, वनराज सिंग झाला, हरविजय सिंग झाला, धर्मेंद्र सिंग झाला, युवराज सिंग झाला आणि अज्ञात लोकांविरोधात तक्रार नोंदवली. या भागातील बलाढ्य लोकांनी ट्रक चालकांकडून पैसे उकळले आणि त्यांना टोल भरण्यास भाग पाडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!