Saturday, July 20, 2024
HomeसामाजिकCA अकोला शाखेतर्फे जीएसटी ऑडिटवर चर्चासत्र संपन्न.

CA अकोला शाखेतर्फे जीएसटी ऑडिटवर चर्चासत्र संपन्न.

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊटन्स ऑफ इंडिया अकोला शाखेतर्फे स्थानिक आय सी.ए.आय.भवन’ येथे ‘जी.एस.टी. वार्षिक विवरण पत्रक व जी.एस.टी. ऑडिट’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

प्रास्ताविकात शाखा अध्यक्ष सीए.सीमा बाहेती यांनी जी.एस.टी. कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलाची अघ्यावत माहिती देऊन विवरण पत्रक व ऑडिट रिपोर्ट’ दाखल करण्याचे आवाहन केले. वक्ते सीए दिपक अग्रवाल यांनी जीएसटी वार्षिक निवरण पत्रक फॉर्म नं. ९ व ऑडिट रिपोर्ट फॉर्म नं. ९ सी वर विशेष तरतुरदीचे विश्लेषण करुन मार्गदर्शन केले. उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे निराकरण केले. चर्चासत्रात सनदी लेखापाल व सीए विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चासत्राच्या यशस्वीतेकरिता कार्यकारी मंडळच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. मंचसंचालन व आभार प्रदर्शन सचिव सीए सुमित आलिमचंदाणी यांनी केले.असे पब्लिक रिलेशन कमेटीचे चेअरमन सीए रमेश चौधरी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!