Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीशाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ ! पान मसाला जाहिरात प्रकरणी मिळाली नोटीस

शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ ! पान मसाला जाहिरात प्रकरणी मिळाली नोटीस

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण तिघांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. तिघांची पान मसाल्याची जाहिरात पुन्हा चर्चेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे.

न्यायालयाच्या सूचनेनुसार, पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमारला नोटीस मिळाली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारच्या सुचनेनुसार उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 9 मे 2024 पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान खंडपीठाने याप्रकरणी आदेश दिले आहेत.

मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. तरी त्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे. शाहरुख, अजय आणि अक्षय तिघांचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. तिघेही पद्म पुरस्काराने सम्मानित आहेत. या सम्मानित लोकांनी केलेल्या अशा जाहिरातींमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे असं याचिकाकर्ते मोतीलाल यादव यांचे म्हणणे आहे. कलाकारांच्या या वागण्यामुळे लोक चुकीच्या मार्गाला जातात असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!