Saturday, June 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला भाजपा पदाधिकारीने माजी इन्कमटॅक्स अधिकारीला लावला लाखोंचा चुना ! पोलिसांनी केली...

अकोला भाजपा पदाधिकारीने माजी इन्कमटॅक्स अधिकारीला लावला लाखोंचा चुना ! पोलिसांनी केली अटक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माजी आयकर अधिकाऱ्याची लाखो रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकोला जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य व माजी सचिव विजयसिंग सोळंकेंना मुंबईतील गावदेवी पोलिसांच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात जाऊन सोळंकेला अटक केली. सदनिका विक्रीच्या नावाखाली लाखो रुपये घेतल्प्रयानंतर सदनिका अन्य दुसऱ्या व्यक्तीलाच विकून माजी प्राप्तिकर अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले विजयसिंग सोळंके जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आहे.

मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील शुभ कर्म गृह निर्माण सोसायटीतील वन बीएचकेची सदनिका ५० लाखात विकत घेण्यास तत्कालिन आयकर अधिकारी विजयकुमार कोहाड आणि सोळंके यांच्यात सप्टेंबर २०१३ मध्ये सहमती झाल्यानंतर कोहाड यांनी सदनिका विकत घेण्यासाठीची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात केली. कोहाड यांनी ठरल्याप्रमाणे वर्षभरात सोळंकेला ३२ लाख २५ हजार रूपये दिले. सदनिकेच्या मूळ मालक या सोळंकेच्या मावशी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व वारसा हक्क प्रक्रियेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोळंके यांना या सदनिकेचा ताबा मिळाला होता.

सोसायटीकडून या सदनिकेला ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही सदनिका कोहाड यांच्या नावाने हस्तांतरित करून विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे दोघांमध्ये ठरले होते. सोळंके याच्याशी कोहाड यांचा जुना परिचय असल्याने ही सहमती मौखिक पातळीवर होती.मात्र, त्यानंतर गेली १० वर्षे सदनिकेची विक्री नोंद करण्यास आणि ताबा देण्यास सोळंके याने टाळाटाळ सुरू केली.

सोसायटीची एनओसी मिळाली नाही असे कारण देत त्याने जवळपास १० वर्षे चालढकल केली. त्यानंतर ३० एप्रिल २०२२ ला पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही सदनिका आरोपी सोळंके यांनी २०१८ मध्ये परस्पर दुसऱ्याला विकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत २३ मार्च २०२३ ला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठांची परवानगी मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी सोळंके अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा या आपल्या मूळ गावी असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर गावदेवी पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुटासा येथील आरोपीच्या मूळ घरी जाऊन अटक केली. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!