Tuesday, March 5, 2024
Home न्याय-निवाडा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाला 10 जानेवारीला ! सुप्रीम कोर्टाकडून नवी...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाला 10 जानेवारीला ! सुप्रीम कोर्टाकडून नवी डेडलाइन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.

राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना २० डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत या बाबतचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता. आता, राहुल नार्वेकर यांना १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

१० जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार

राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ मागण्यात आली होती. राहुल नार्वेकर यांच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत लागणार आहे.राहुल नार्वेकर यांच्याकडून सुप्रीम कोर्टात यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत मागण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं ३१ डिसेंबरची मुदत दिली होती.

यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबईत आणि नंतर हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर नागपूरमध्ये सुनावणी घेतली होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

आजची सर्वात मोठी बातमी ! भाजपला सुप्रीम झटका : ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द : असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निनावी निवडणूक रोख्यांमुळे संविधानातील अनुच्छेद...

आज अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष देणार निकाल ! राष्ट्रवादी आमदारांचं प्रकरण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल...

अकोला बार असोसिएशनची निवडणूक ! शेवटच्या दिवशी १७ अर्ज दाखल : मतदान ९ फेब्रुवारीला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला होत असून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

Recent Comments

error: Content is protected !!