Saturday, July 27, 2024
Homeअर्थविषयकअकोल्यात अजय महिला शक्ती संमेलनाचा हजारो महिलांनी लाभ घेतला.

अकोल्यात अजय महिला शक्ती संमेलनाचा हजारो महिलांनी लाभ घेतला.

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अतिशय नाविन्यपूर्ण कल्पनांनी सजलेल्या महत्त्वपूर्ण अशा अजय महिला शक्ती संमेलनाचा जिल्ह्यातील जवळपास 1300 महिलांनी लाभ घेतला. सायंकाळी जल्लोषात संमेलनाचा समारोप करताना महिला भावविभोर झाल्या होत्या. स्थानिक खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहामध्ये आज रविवार दि. 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन या वेळेत संपन्न झालेल्या अजेय महिला शक्ती संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका स्नेहल ढवळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्ता पूर्वा थोरात यांनी ओजस्वी वाणीत महिलांना मार्गदर्शन केले. संमेलनाला विदर्भ समन्वयक मीराताई कडबे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या आयोजिका आरती लढ्ढा तर सहसंयोजिका सरिता शर्मा, कांचन हरणे, सुजाता मुलमुले मूर्तिजापूर व कोमल चिमणकर तेल्हारा होत्या. चित्रा बापट व लता किडे प्रमुख मार्गदर्शक होत्या .प्रत्येक स्त्री विशिष्ट असून तिच्यात काही विशिष्ट गुणांचा समुच्चय असतो .या गुणांना ओळखण्यासाठी त्या गुणांना वाव मिळण्यासाठी आणि या गुणांच्या मदतीने स्वतःचा समाजाचा देशाचाही आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी गरज असते.

महिलांना यासाठी एकत्र करण्यासाठी आणि त्यांना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात आयोजित करण्यात आलेल्या जवळपास 400 संमेलन पैकी एक महत्त्वाचे संमेलन अकोला शहरात यशस्वीपणे पार पडले.

संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्र वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल्स लघु उद्योजकांचे स्टॉल्स होते. संमेलनात पार पडलेल्या तीन महत्त्वपूर्ण सत्रात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, स्वास्थ, महिला सुरक्षा इत्यादि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ शहरातील महिलांनी घेतला. अतिशय नाविन्यपूर्ण कल्पनांनी सजलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा जिल्ह्यातील जवळपास 1300 महिलांनी लाभ घेतला. संमेलनाला यशस्वी करण्याकरिता अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!