Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याअकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला १ महिन्याची मुदतवाढ

अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला १ महिन्याची मुदतवाढ

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सणासुदीच्या दिवसांत होत असलेली अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता जानेवारी २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे.

नांदेड रेल्वे विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ जानेवारी २०२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.

गाडी क्रंमाक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ जानेवारी २०२४ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२:१५ वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण १० फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेला महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने अकोलेकर प्रवाशांना तिरुपती जाणे शक्य होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!