Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाअखेर भारतीय कुस्ती महासंघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी बरखास्त

अखेर भारतीय कुस्ती महासंघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी बरखास्त

अकोला दिव्य न्युज ब्युरो : स्पर्धा आयोजित करताना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली आहे. तसंच, नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. याप्रकरणी महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धा तातडीने आयोजित करण्यात आली आणि स्पर्धा आयोजित करताना नियमांचं पालन केलं नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली. तसंच, बृजभूषण शरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदिनी नगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने साक्षी मलिकसह अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने कारवाई केली.

या कारवाईवर बृजभूषण शरण सिंह म्हणाले, संजय सिंह हे माझे निकटवर्तीय नाहीत. जुन्या कमिटीला तत्काळ एक निर्णय घ्यावा लागला. अंडर २० आणि अंडर १५ च्या राष्ट्रीय स्पर्धांबाबत. ३१ डिसेंबरला त्यांचं सत्र समाप्त होईल. त्यानंतर हे टुर्नामेंट संपत आहे. त्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जाईल. यामुळे महासंघातील सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत खेळाचं वातावरण सुरू व्हावं, याकरता हा निर्णय घेण्यात आला होता.

“येत्या ४-५ दिवसांत स्पर्धेची व्यवस्था करण्यास महासंघाच्या एकाही सदस्याने सकारात्मकता दाखवली नाही. त्यामुळे ही स्पर्धा नंदिनी नगरमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं. हे ज्या बैठकीत ठरवलं गेलं, त्यावेळी माझा निवृत्तीचा कार्यक्रम होता. त्यामुळे मीही तिथे होतो. परंतु, १५ आणि २० वर्षीय मुलांचं वर्ष वाया जाऊ नये, याकरता नंदिनी नगर येथे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी महासंघातील २५ सदस्यांनी लिखित आणि मौखिक संमती दिली होती, असंही बृजभूषण सिंह म्हणाला.

साक्षी मलिक काय म्हणाली होती?

मी कुस्ती सोडली आहे. पण काल ​​रात्रीपासून मला काळजी वाटत आहे, त्या ज्युनियर महिला कुस्तीपटूंची. ते मला फोन करून सांगत आहेत की २८ तारखेपासून ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे आणि नवीन कुस्ती महासंघाने ती घेण्याचे ठरवले आहे नंदनी नगर गोंडामध्ये. गोंडा हे ब्रिजभूषणचे क्षेत्र आहे. आता कल्पना करा कोणत्या वातावरणात ज्युनियर महिला कुस्तीपटू तिथे कुस्ती खेळायला जातील? या देशात नंदनीनगर व्यतिरिक्त कुठेही स्पर्धा घेण्यास जागा नाही का? काय करावे समजत नाही, अशी एक्स पोस्ट साक्षी मलिकने काल (२३ डिसेंबर) पोस्ट केली होती.

तिच्या पोस्टनंतर अनेकांनी या स्पर्धेवरून टीकाही केली. तसंच, केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही याची दखल घेऊन महासंघाची नवनियुक्ती कार्यकारिणीच बरखास्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!