Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाप्रभातचे दोन विद्यार्थी तायक्वाँडो स्पर्धेत राज्यस्तरावर

प्रभातचे दोन विद्यार्थी तायक्वाँडो स्पर्धेत राज्यस्तरावर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमरावती विभागीय तायक्वाँडो स्पर्धेत विभागाच्या विविध शाळेच्या खेळाडूंसह प्रभात किड्स स्कूलच्या तायक्वाँडोपटूंनी सहभागी होऊन या खेळामध्ये रंगत आणली. प्रभातच्या दोन तायक्वाँडोपटूंनी विरुद्ध स्पर्धकांना मात देत उत्कृष्ट यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलींमध्ये 63 ते 67 या वजनगटात संस्कृती नागे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर मुलांमध्ये 51 ते 55 या वजनगटात अथर्व चोपडे ह्याने सुद्धा प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत यश प्राप्त केले. तसेच पुढील स्पर्धा दि. 21 ते 24 डिसेंबर दरम्यान लातुर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राज्यस्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!