Tuesday, March 5, 2024
Home गुन्हेगारी 48 हजाराची लाच घेतांना डॉ. सचिन वासेकर बुलडाणा एसीबीच्या जाळ्यात

48 हजाराची लाच घेतांना डॉ. सचिन वासेकर बुलडाणा एसीबीच्या जाळ्यात

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच्या स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना 48 हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. डॉ. वासेकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांचावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे करोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत देखील करण्यात आले होते. पण लाच घेतांना पकडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

धाड नाक्यावर एका हॉटेलमध्ये एका कंत्राटी डॉक्टरकडून ४८ रुपये रोख स्वरूपात लाच घेतांना डॉ.वासेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या जाळ्यात ओढले गेले. डॉक्टरची ड्युटी लावण्यावरून डॉ. वासेकर सतत पैश्यांची मागणी करायचे. यासंदर्भात त्यांच्या काही रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे गोळा झाल्यावर सदर कार्यवाही एसीबीच्या धडाकेबाज dysp शीतल घोगरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

डॉ. वासेकर यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले होते. अलिकडे लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविरोधात तक्रार करण्याचे प्रमाण कमी आहे. यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

माजी आमदार राठी यांची गोळ्या घालून हत्या ! एका कार्यकर्त्याचा देखील मृत्यू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : इंडियन नॅशनल लोकदल (INLD) पक्षाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रविवारी...

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल ! वाघाची शिकार केल्याचे प्रकरण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विविध वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी वनासंदर्भात केलेले विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

Recent Comments

error: Content is protected !!