Saturday, June 22, 2024
Homeशैक्षणिकहॅप्पी अवर्स प्रायमरी स्कूलमध्ये संभाषण कौशल्य कार्यशाळा

हॅप्पी अवर्स प्रायमरी स्कूलमध्ये संभाषण कौशल्य कार्यशाळा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रत्येक पाल्यात असलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधून पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांसोबत घरातही इंग्रजीत केल्याने विद्यार्थ्यांना भाषेची अधिक ओळख होईल. असे सांगून सांगोला येथील जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ अविनाश देशमुख बोलत होते. यावेळी शिक्षकाची भूमिका स्पष्ट करताना, चांगल्या आणि वाईट पालकत्वाच्या कौशल्याचे महत्त्व विशद केले.

विद्यार्थ्यांच्या यश आणि अपयशाला अनेकवेळा पालक जबाबदार ठरतात. पालकांनी पाल्यांना पाठिंबा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. शेवटी त्यांनी शिक्षक + पालक + विद्यार्थी यांचा समावेश असलेल्या शिक्षणाचा त्रिकोण स्पष्ट करीत त्यांचे महत्त्व तपशीलवार सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने पालक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!