Tuesday, March 5, 2024
Home सांस्कृतिक विद्यार्थ्यांचा जल्लोष ! श्री समर्थ पब्लिक स्कूलचे सांस्कृतिक महोत्सव धूमधडाक्यात

विद्यार्थ्यांचा जल्लोष ! श्री समर्थ पब्लिक स्कूलचे सांस्कृतिक महोत्सव धूमधडाक्यात

अकोला दिव्य न्युज ब्युरो : श्री समर्थ शिक्षण समूहातील श्री समर्थ पब्लिक स्कूल रणपिसेनगर व रिधोरा शाखा आणि श्री समर्थ नर्सिंग महाविद्यालयाचा ‘मिलन २०२३’ या त्रिदिवसीय सांस्कृतिक सोहळ्यात केजी ते पीजी अशा विविध गटात श्री समर्थ शिक्षण समूहातील विद्यार्थ्यांनी अवर्णनीय सहभाग नोंदवून सांस्कृतिक महोत्सवाची शान वाढविली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमनताई भास्करराव बाठे यांची आशीर्वादरुपी उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गणित दिवसाचे औचित्य साधून प्रा. नितीन बाठे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सीबीएससी बॉक्सिंग साऊथ झोनमध्ये शाळेची विद्यार्थिनी समीक्षा सोळंके हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिलाही सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

स्वागत व कौतुक सोहळ्यानंतर शाळेतील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. शिक्षक पंकज गोसावी व सहकारी शिक्षकांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे संगीत शिक्षक हार्दिक दुबे यांनी पोवाड्याचे सुंदर सादरीकरण केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. नितीन बाठे म्हणाले की, शंभरातील नव्याण्णव विद्यार्थी अभ्यासाकडे वळतात, तर एकच विद्यार्थी कलेकडे वळतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ध्यानात ठेवून शाळेच्या वतीने सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. त्यासाठीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजचे आयोजनही त्याचाच एक भाग आहे, असे प्रा. नितीन बाठे पांनी सांगितले.

श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या रणपिसे नगर शाखेतर्फे ‘ख्वाहिश’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रमुख पाहुणे सुमनताई भास्करराव बाठे, संस्थाध्यक्ष प्रा. नितीन बाठे, जयश्री बाठे यांच्यासह संस्थेच्या संचालकांची उपस्थिती होती. प्रारंभी माता सरस्वती श्री स्वामी समर्थाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानीच्या गोंधळ व जागरणाने झाली. नर्सरी ते युकेजी विद्यार्थ्यांनी ‘खेल खेल में’ या संकल्पनेतून उत्कृष्ट सादरीकरण केले. ‘पंचम’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या चित्रकला, नृत्य, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान, संगीत या विविध कलागुणदर्शनात पहिली ते सातवी या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उद्‌बोधक कार्यक्रम सादर केले.

इसत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी G-20 चे महत्त्व पटवून दिले. वेशभूषा व वीस भाषांतून सुंदर सादरीकरण केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले.आजच्या युगातील W Edit with WPS Offic संगणकाचे महत्त्व अभिनव नृत्याद्वारे पटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन कला आणि शस्त्रविद्या आधुनिक काळात काहीशा लोप पावणाऱ्या लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुंपण या कलांचे सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.

श्रीमद्भागवत ग्रंथातील दशावतारांवर आधारित सादरीकरणाने संपूर्ण वातावरण विष्णुमय झाले होते. याप्रसंगी विठ्ठल अवताराचे सादरीकरण करताना पालखी सोहळ्याने भाविक भक्तिरंगात रंगले होते. विठू माऊलीच्या गजराने हा परिसर दुमदुमला होता. प्रा. नितीन बाठे व मान्यवरांनी पालखीचे पूजन व आरती केली. प्रमुख अतिथी सुमनताई बाठे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व धार्मिक, सांस्कृतिक संस्कार ही आजच्या युगाची ही गरज असल्याचे सांगितले. संचालन अल्फा बुद्धदेव व विद्यार्थी मानस कडू व राधिका चांदुरकर यांनी केले.

या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात नर्सिंग व कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘फ्लोरेंझा’ अंतर्गत कलाप्रदर्शन केले. मुख्यअतिथी व स्त्री रोगतज्ञ डॉ. रेखा पाटील यांनी परिचारकांच्या सेवाभावाचे कौतुक करुन सेवाभाव हा वैद्यकीय क्षेत्राचा अविभाज्य घटक असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लॅम्पलाईटिंग व शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला. या तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्यात संचालक प्रा.जयश्री बाठे, राजेश बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्रा.किशोर रत्नपारखी, प्रा. योगेश जोशी, मुख्याध्यापक सुमित पांडे, मुख्याध्यापिका सुवर्णा गुप्ता, प्रा. ज्ञानधिनाहारी, अश्विनी थानवी, समन्वयक अल्पा बुद्धदेव व सीमा मिश्रा, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

अकोल्यात विहिंप आणि श्री रामनवमी शोभायात्रा समितीकडून विविध धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विश्वाचे आराध्य, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांचे अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात त्यांच्या बाल स्वरूप नवीन मुर्तिची २२ जानेवारीला...

आज सायंकाळी डेल्टा टीव्हीएस श्रीराम मंदिर झांकी व महाआरती :

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्येतील बहुप्रतिक्षित श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलपर्वावर आज शुक्रवार १९ जानेवारीला डेल्टा टीव्हीएस परिसरात अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम...

श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अकोल्याचा तबलावादकाचा ताल दुमदुमनार

गजानन सोमाणी : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात होत असून, राजराजेश्वर नगरीचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

Recent Comments

error: Content is protected !!