अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशासह महाराष्ट्रात ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्ण वाढत असून अकोल्यात ‘कोरोना’चा सब व्हेरियंट असलेल्या ‘जेएन.१’ चा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग यामुळे एक्शन मोडमध्ये आले असून हा रुग्ण अकोला शहरातील असून सद्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात आहे. बाहेरगावी जाण्यासाठी कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचं ट्रॅव्हल्स कडून सूचना करण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्तीने करोना टेस्ट केली आणि कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आलं. त्यासोबत त्याच्या परिवाराचीही कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. आता हा रुग्ण बरा आहे. रुग्णाची 5 डिसेंबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तपासणीत रुग्णात ‘जेएन.१’ व्हेरियंट विषाणू आढळल्याचा अहवाल 23 डिसेंबरला प्राप्त झाला आहे. पण रुग्ण हा क्वारंटिन राहल्याने आणि त्यांच्या कुटुंबीयां शमध्ये कोणीही पॉझिटिव्ह नाही. सद्यस्थितीत या व्यतिरिक्त अकोला जिल्ह्यात किंवा शहरात ‘जेएन.१’ व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी ही माहिती देताना सांगितले.