Saturday, June 22, 2024
Homeसामाजिकजीपीए अकोला अध्यक्षपदी डॉ. सतीश उटांगळे तर सचिवपदी डॉ . विनय दांदळे

जीपीए अकोला अध्यक्षपदी डॉ. सतीश उटांगळे तर सचिवपदी डॉ . विनय दांदळे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलाची वार्षिक सर्वसाधारण सभा जीपीए हॉल मध्ये जीपीए अध्यक्ष डॉ. सुनील बिहाडे यांच्या अध्यक्षतेत पडली. आमसभेत मागील कार्यकारिणीच्या २०१८ – २०२३ ह्या कार्यकाळात संपन्न झालेल्या उपक्रमांची माहिती सचिव डॉ. संदीप चव्हाण यांनी अहवालात सादर केली.
आमसभेनंतर निवडणूक अधिकारी डॉ. चंद्रकांत पनपालिया आणि डॉ. सुनील फोकमारे यांच्या मार्गदर्शनात २०२४ – २०२७ ह्या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणी अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून डॉ. सतीश उटांगळे तर सचिव म्हणून डॉ. विनय दांदळे आणि कोषाध्यक्षपदी डॉ.आदित्य नानोटी तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रवीण अग्रवाल आणि डॉ. संदीप चव्हाण ह्यांची तर सहसचिव म्हणून डॉ.दीपाली भांगडीया यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.नरेंद्र श्रीवास, डॉ.प्रियंका देशमुख, डॉ.संजय तोष्णीवाल, डॉ. प्रद्युम्न शाह, डॉ . चंद्रकांत वाघमारे, डॉ.अनिरुद्ध कुळकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मार्गदर्शक सदस्य डॉ.अनुप कोठारी, डॉ.किशोर मालोकार , डॉ.चंद्रकांत पनपालिया, डॉ.सुनिल बिहाडे, डॉ.राजेंद्र अग्रवाल म्हणून ह्यांची निवड करण्यात आली.

सर्वसाधारण सभेला जीपीएचे सदस्य, डॉ.अशोक ओळंबे , डॉ. सुनील फोकमारे, डॉ . महेश कुळकर्णी, डॉ. रवी अलिमचंदानी,डॉ.मनोहर घुगे, डॉ.अनिल तोष्णीवाल,डॉ.राजेश अग्रवाल,डॉ.गिरीष अग्रवाल,डॉ.अजय पाटील , डॉ. तुषार माळोकर , डॉ . नरेंद्र गोंड , डॉ . पांडुरंग धांडे , डॉ . प्रशांत सांगळे , डॉ.प्रवीण अग्रवाल , डॉ . सुनील लुल्ला , डॉ. युवराज देशमुख , डॉ.आनंद चतुर्वेदी, डॉ.अजय पाटील, डॉ.अरविंद गुप्ता, डॉ.राजू देशपांडे यांचासह जीपीएचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!