Saturday, June 22, 2024
Homeशैक्षणिकडॉ. माहेश्वरी अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ! आज मध्यान्हपूर्व पदभार स्वीकारणार

डॉ. माहेश्वरी अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ! आज मध्यान्हपूर्व पदभार स्वीकारणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. विजय माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी कुलगुरू प्रमोद येवले हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. पण, नवीन कुलगुरूंची निवड अद्याप झाली नसल्याने डॉ. माहेश्वरी यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदची अतिरिक्त सूत्रे सोपविण्यात यावा, असे राजभवनातून आदेश देण्यात आले आहेत.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांच्याकडे कुलगुरुपदाची अतिरिक्त सूत्रे सोपविण्यात आली असून आज शुक्रवार दिनांक २९ डिसेंबरला मध्यान्हपूर्व ते पदभार स्वीकारणार आहेत.नवीन कुलगुरूंची निवड होईस्तोवर डॉ. माहेश्वरी यांच्याकडे प्रभार राहणार आहे. डॉ. माहेश्वरी (जन्म ३ जुलै १९६४) यांनी इंदोर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय येथून जैवरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय कार्याचा व्यापक अनुभव आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. आता पुढील महिनाअखेर नव्या कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!