Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यअकोला पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसनाचा त्यांनाच विसर ?

अकोला पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसनाचा त्यांनाच विसर ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि अकोला जिल्हा पालकमंत्री यांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वच अद्यावत आरोग्यसेवा असतील व ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्याचे तदनंतर कोट्यावधी रुपयांची यंत्र सामुग्री ऊपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन कमकुवत ठरत असल्याचे दिसुन येत आहे. रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी अपघात कक्ष कार्यान्वित आहे.मात्र अपघात कक्षात प्रिया गुजराल ही खामगाव वरून कुत्रा चावल्यामुळे येथे इंजेक्शन घ्यायला आली होती. परंतु सदर इंजेक्शन उपलब्ध नव्हते. वैद्यकीय अधिकारींनी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने परत पाठवले.तसे वैद्यकीय अधिकारींनी लिहूनही दिले. काही दिवसांपूर्वी राधा नागसेन इंगळे या महिलेला एम.आर.आय करिता सर्वोपचार येथून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले. तेव्हा एम.आर.आय तपासणीसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन बाहेरून आणावे लागले.
आरोग्य शिबिरात ना. फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसनाची तात्काळ पूर्तता करावी यासाठी नुकत्याच अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री यांना स्मरण करून देण्यासाठी स्मरणपत्र दिले. यावेळी पालकमंत्री यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सर्वच यंत्रणा उपलब्ध असल्याचे सांगितले. तरी लवकरात लवकर सर्वोपचार रुग्णालयात व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिक्त जागांसाठी पदभरती तात्काळ करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात व स्मरणपत्रात नमुद केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!