Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी ! राज्याचा पोलीस महासंचालकपदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला

मोठी बातमी ! राज्याचा पोलीस महासंचालकपदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याने त्यांना ही कमान देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. आता शुक्ला या रजनीश सेठ यांची जागा घेणार आहेत. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. शुक्ला यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची बैठक शुक्रवार २९ डिसेंबर रोजी झाली. यावेळी त्यांनी महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यामध्ये पहिले नाव होते रश्मी शुक्ला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा होता. अखेर आज सरकारने शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत

राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात आरोपीच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव होते.  त्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. शुक्ला हे राज्य गुप्तचर विभागाचे तेव्हा प्रमुख होते. त्यावेळी त्यांच्यावर संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!