Tuesday, June 25, 2024
Homeगुन्हेगारीकुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली.

गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रुग्णालय परिसरात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!