Saturday, November 9, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यातून 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण ? अज्ञात व्यक्तीने पळवून नेण्याची तक्रार

अकोल्यातून 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण ? अज्ञात व्यक्तीने पळवून नेण्याची तक्रार

रामदास पेठ पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ खेळत असताना एका पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. गुड्डी रवी मलाकर असे तिचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली कॉलनी, प्रकाश नगर चंद्रपूर येथील रहिवासीआहे. या प्रकरणी रवी मलाकर यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपड्यांमध्ये बाहेरगावातील काही कुटुंब मुक्कामी आहेत. टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ रवी मलाकर यांची पाच वर्षांची गुड्डी नामक चिमुकली खेळत होती. यादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले. ही बाब कुटुंबीयांच्या ध्यानात येताच त्यांनी मुलीची शोधाशोध केली.

परंतु, तिचा कोठेही पत्ता लागतनसल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या मुलीचा रंग सावळा असून, केसाचे दोन चोटी बांधलेली आहे. तसेच काळा शर्ट, लाल मिडी परिधान केलेली आहे. ही मुलगी कोणालाही आढळून आल्यास रामदास पेठ पोलिसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपहरण प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!