Thursday, September 19, 2024
Homeताज्या घडामोडीमालदीवची भारताला डेडलाईन !15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची...

मालदीवची भारताला डेडलाईन !15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची तंबी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला भारत आणि मालदीवमधला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारताला आपले सैन्य मालदीवमधून हटवण्यासाठी इशारा दिला असून, भारताला 15 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, मुइज्जू शनिवारीच चीन दौऱ्यावरुन परत आले आणि भारताला हा इशारा दिला आहे. चीन दौऱ्यात मुइझू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरुन ही तुकडी तेथे तैनात करण्यात आली होती. भारतीय लष्कराची ही तुकडी मालदीवच्या लष्कराला सागरी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण कार्यात मदत करते, परंतु आता मुइझ्झूच्या सरकारने भारतीय लष्कराच्या तुकडीला 15 मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत.

तुकडीमध्ये 88 सैनिकांचा समावेश 
मालदीवचे सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी म्हटले की, भारतीय सैन्य यापुढे देशात राहू शकत नाहीत. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या सरकारचे हे धोरण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे 88 सैनिक उपस्थित आहेत. मुइज्जू सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते, परंतु आता त्यांनी यासाठी मुदतही निश्चित केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!