Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीनिवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे ! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे ! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोण हे ठरवण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी ठाकरे गटाकडून तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केली होती. या प्रतिज्ञापत्राचं काय केलंत असा प्रश्न विचारत निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

वरळीत आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेत ते बोलत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, माझं राहुल नार्वेकरांना आव्हान आहे की नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय यावं. मी ही तिथे सुरक्षेविना येईन. तिथंच तिथे नार्वेकरांनी सांगावं की शिवसेना कोणाची? मग जनतेचे ठरवावं की कोणाला पुरावा आणि कोणाला गाडावा. शिवसेना त्यांना विकली असेल तर ती काही विकावू वस्तू नाही. आज तर माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपण निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. कारण, त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जवळपास १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्र लिहिले होते. या प्रतिज्ञापत्राच्या गाद्या करून निवडणूक आयोग त्यावर झोपलं आहे का? एकतर हे प्रतिज्ञापत्र स्वीकारा. नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे. येथे शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. येथे कोणी दोन नंबरचे पैसे कमावणारे कोणी नाही. ईडीसुद्धा त्यांचाच नोकर आहे.राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं
राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं. तुमच्याबरोबर जर सगळं काही आहे, शिवसेना विकली असेल तर विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही. जी काही थट्टा चाललेली आहे ती आज तुम्ही पाहिली.

“गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याशिवाय आता मढ्याला उपाव नाही” अशी सुरेश भटांची कविता आहे. राहुल नार्वेकर यांनी तसाच निर्णय घेतला आहे. गारद्यांच्या गर्दीत हे सामील झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत ही अवदसा जन्माला आली आहे. लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहीत नाही ही महाराष्ट्राची माती अशांना गाडून टाकते आणि संपवून टाकते. सगळा क्रम पाहिल्यानंतर जे काही पुरावे सादर केले ते सादर करणं आवश्यक होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!