Saturday, July 27, 2024
Homeसांस्कृतिकआज 'रामलल्ला' नव्या मंदिर परिसरात ! उद्या गर्भगृहात आगमन

आज ‘रामलल्ला’ नव्या मंदिर परिसरात ! उद्या गर्भगृहात आगमन

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : अयोध्यातील नवनिर्मित मंदिरात रामलल्लांच्या २२ जानेवारीला होणाऱ्या बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापैकी आज बुधवार १७ जानेवारीला रामलल्लांची मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन होणार आहे.उद्या गुरुवार १८ जानेवारीला मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. तेथे तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास विधी पार पडणार आणि नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने याची सांगता होईल.

रामलल्लांच्या २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंगळवार १६ जानेवारीला मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विधींनी सुरुवात झाली. मंगळवारी प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा झाली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरू झाले असून ते अभिषेक समारंभापर्यंत सुरू राहील. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करून विधी करत आहेत, अंतिम अभिषेकापर्यंत सर्व विधींचे यजमानपद ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा यांच्याकडे आहे. सर्व विधी मिश्रा दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे.

प्रायश्चित, कर्मकुटी पूजा कशासाठी? 
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी अनावधानाने काही चुका झाल्यास किंवा आतापर्यंतच्या एकूण कार्यात कमतरता राहिल्यास त्याबाबतचे प्रायश्चित म्हणून ही पूजा केली जाते. कर्मकुटी पूजा म्हणजे यज्ञशाळा पूजन होय. यामध्ये भगवान विष्णूंना आवाहन करून त्यांच्याकडून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळविली जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!