Saturday, June 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला : महिलेचा खून करुन आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न : घटनेला अनैतिक संबंधाची...

अकोला : महिलेचा खून करुन आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न : घटनेला अनैतिक संबंधाची किनार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : एकमेकांचे घरा शेजारी राहणाऱ्या आणि नात्याने दिर भावजय असलेल्या महिला व पुरुष यांच्यातील अनैतिक संबंधातून प्रेयसी विवाहित महिलेचा गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकराने स्वतःच्या गळ्यावर चाकूने घाव मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून गंभीर रित्या जखमी झालेल्या आरोपीचा अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून माना पोलीस अधिक तपास करीत आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार घटनेतील आरोपी अनिल श्रीकृष्ण तायडे (४२) हा अकोट तालुक्यातील लोहरी गावाचा रहिवासी असून, मुर्तीजापूर तालुक्यातील माना गावात राहणाऱ्या गजानन रामाजी लांडे, (42) यांच्या शेजारी राहत होता. नात्याने आरोपी हा लांडे यांचा चुलत भाऊ होता. शेजारी शेजारी राहत असल्याने शोभना गजानन लांडे (32) सोबत आरोपीचे अनैतिक संबंध बनले.मयताचे पती गजानन रामाजी लांडे, हे वडगाव येथे कामाला गेले असताना आरोपी हा मृतकाचा घरी गेला. काही वेळेनंतर घरातून आरडा ओरड ऐकू येत होते. पण याकडे शेजारच्यांनी दुर्लक्ष केले.

दरम्यान मृतकाचा पती घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. फिर्यादी आणि लोकांनी घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेव्हा मृतक आणि आरोपी रक्ताचे थारोळ्यात पडलेले होते.आरोपीने मृतकाच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार चाकूने जखमा करून तीला जीवाने ठार मारले. तसेच स्वतःच्या गळ्यावरपण चाकूने घाव मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी तक्रार फिर्यादी मृतकाच्या पतीने दिल्यावरुन अनिल श्रीकृष्ण तायडे वर कलम 302, 309 भा.दं.वि. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीला वैद्यकीय उपचार कामी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!