Saturday, June 22, 2024
Homeसामाजिकआ. सावरकरांच्या हस्ते २६ जानेवारीला जीपीए अकोलाच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

आ. सावरकरांच्या हस्ते २६ जानेवारीला जीपीए अकोलाच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व उपचार पध्दतीच्या समस्त वैद्यकीय व्यावसायिकांची एकमेव संघटना असलेल्या जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलातर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा तसेच वर्ष २०२४ ची जीपीए दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

जीपीए हॉलच्या प्रांगणात २६ जानेवारीला आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते तसेच जयंत मसने, डॉ. शंकरराव वाकोडे यांच्या मुख्य उपस्थितीत आणि जीपीएचे मार्गदर्शक डॉ. किशोर मालोकार, डॉ. चंद्रकांत पनपालिया, डॉ.सुनिल बिहाडे, डॉ.फोकमारे, डॉ.अशोक ओळंबे, विद्यमान अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे, सचिव डॉ. विनय दांदळे, प्रोजेक्ट इन्चार्ज डॉ.नरेंद्र गोंड, डॉ. संदीप चव्हाण यांच्या उपस्थितीत आ. सावरकर यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजपूजन व ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

त्यानंतर आ. रणधीर सावरकर व प्रमुखअतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते जीपीए दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले . याप्रसंगी सहसचिव डॉ. दीपाली भांगडीया, डॉ. प्रियंका देशमुख, डॉ. युवराज देशमुख, डॉ.प्रद्युम्न शाह, डॉ.संजय तोष्णीवाल , डॉ.अनिल तोष्णीवाल, डॉ. रवी आलिमचंदानी, डॉ. कऱ्हे, डॉ सुभाष बढे, डॉ.राजेश काटे, डॉ. पांडुरंग धांडे , डॉ.गजानन माळी, डॉ . राकेश शाह , डॉ.नरेंद्र श्रीवास, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. पंकज गुप्ता, डॉ.राजू देशपांडे, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ.उज्वल कराळे, डॉ.सौ.राजपूत, डॉ.सौ. महल्ले, डॉ.आशिष पनपालिया, डॉ. सुनील लुल्ला, डॉ. सुनील देशमुख, डॉ.जाधव, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ.राजकुमार भांगडीया, डॉ. महेश गुप्ता, डॉ.नितीन धनोकर यांच्यासह बहुसंख्य डॉक्टर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जीपीए सचिव डॉ. विनय दांदळे तर प्रास्ताविक जीपीए अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे आणि आभारप्रदर्शन डॉ.नरेंद्र गोंड यांनी केले. शेवटी जीपीएचे दिवंगत सदस्य तसेच सदस्यांचे दिवंगत नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!