Wednesday, February 21, 2024
Home गुन्हेगारी बिल्डर ललित टेकचंदानींना अटक ! 44 कोटींनी आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा...

बिल्डर ललित टेकचंदानींना अटक ! 44 कोटींनी आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रसिद्ध बांधकाम व्यवासयिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ललित टेकचंदानी यांच्यावर तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ललित टेकचंदानी यांना अटक करण्यात आली. टेकचंदानी यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ANI या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी नऊ तास त्यांची याच प्रकरणात चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६० ग्राहकांची ४४ कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे.

चेंबूर येथील हिरा जाधवानी यांच्या तक्रारीनुसार सुप्रीम डेव्हलपर्स प्रा. लिमिटिडेचे ललित टेकचंदानी, काजल टेकचंदानी, अरुण माखीजानी, हसन इब्राहीम आणि सुप्रीम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे आजी-माजी संचालक, भागीदार आणि प्रमोटर्स यांनी प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली ७३ लाख ६० हजार रुपये घेऊन घराचा ताबा दिला नसल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर इतरही तक्रारी आल्या. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. मंगळवारी ललित टेकचंदानी यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय होते
ललित टेकचंदानी हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ललित टेकचंदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातले निर्णय टेकचंदानी यांना विश्वासात घेऊन घेतले जात होते अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. ललित टेकचंदानी आणि छगन भुजबळ यांचे दहा वर्षे उत्तम संबंध होते. २०१४ मध्ये या दोघांमध्ये वितुष्ट आले.

RELATED ARTICLES

‘घायल’ चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना दोन वर्षांचा तुरुंगवास.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या राजकुमार संतोषी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. चेक...

अकोल्यातील ‘कुरिअर मॅन’ची ६० लाखांची रोकड असलेली बॅग खासगी बसमधून लंपास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून खासगी बसमधून पैसे घेऊन जात असताना चहा पाण्या साठी थांबलेल्या ठिकाणी ६० लाखांची रोकड...

अकोल्यात शाळेच्या छतावर एक अर्भक व काही अवशेष आढळले ! संशयाची सुई लेडी हॉर्डिंगकडे ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानासमोरच असलेल्या, अडगळीत पडलेल्या जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या गच्चीवर अर्भक आणि काही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

नवे आंदोलन ! सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक...

बुलडाणा जिल्ह्यात ४०० जणांना विषबाधा ! सप्ताहानिमित्त भगर व आमटीचे भाविकांना वाटप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सप्हातानिमित्त करण्यात आलेल्या भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे ४०० जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली....

रेडिओवरील ‘बहनों और भाईयो’ चा प्रसिद्ध आवाज हरपला !अमीन सयानी यांचे निधन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन...

सत्य स्वीकारण्याचा ‘प्रामाणिकपणा’ आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर असलेले संदेशखाली हे मागास ठिकाण. त्या...

Recent Comments

error: Content is protected !!