Tuesday, March 5, 2024
Home शैक्षणिक 'प्रभात'च्या शिरपेचात मानाचा तुरा ! आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत अद्वैत जोशी गुणवंत...

‘प्रभात’च्या शिरपेचात मानाचा तुरा ! आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत अद्वैत जोशी गुणवंत यादीत

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्ये वृद्धिंगत व्हावी आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई, नवी दिल्ली) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थी अद्वैत जोशी याने सुयश प्राप्त केले असून पुणे विभागातील गुणवंतांच्या यादीत झळकला आहे.

राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेमध्ये देशभरातून इयत्ता आठवी ते दहावीच्या तब्बल ५,५०,००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अद्वैत जोशी याने उत्कृष्ट प्रदर्शन केले असून पुणे विभागाच्या गुणवंतांच्या यादीत अग्रक्रमाने झळकला आहे. अद्वैत जोशी यास गणित विभागप्रमुख प्रिया शर्मा, मिथिलेश दुबे, योगेश चोपडे, अनिरुद्ध डेकाटे यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. अद्वैत यांच्या या गौरवशाली यशाबद्दल प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांनी कौतुक केले आहे.

प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, शाळा समन्वयक मो. आसिफ, सी.बी.एस.ई. समन्वयक प्रशांत होळकर व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Happy Hours ! ‘प्रिंस ऑफ अयोध्या’ या नाटिकेने उपस्थित पालकांची मने जिंकली.

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्यातील नवनिर्मित मंदिरात श्रीराम यांच्या बालस्वरुप मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त 'रामायण' मधील प्रमुख घटना गुंफून सजीव...

यंदा परिक्षांवर बहिष्कार ? दहावी, बारावीचे विद्यार्थी अस्वस्थ ! बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र...

मासिक स्वास्थ व मासिक धर्म स्वच्छता’ विषयावर मा सारदा ज्ञानपीठ येथे रोटरी क्लबकडून चर्चासत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मासिक पाळी ही स्त्री मुलींच्या जीवनातील शारीरिक घडनातील नैसर्गिक प्रक्रिया असून असून ते सहजतेने स्वीकारावे आणि आरोग्याची...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

Recent Comments

error: Content is protected !!