Saturday, March 2, 2024
Home ताज्या बातम्या शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार..... ! जितेंद्र आव्हाडांचा शाब्दिक...

शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार….. ! जितेंद्र आव्हाडांचा शाब्दिक प्रहार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बारामतीत आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यावेळी काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक आहे सांगतील. पण तुम्ही मात्र अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. शेवटची निवडणूक सांगतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत. असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.आपल्या काकाच्या मृ्त्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली. असं म्हणत आव्हाडांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतल एक भाषण दाखवावं. साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखलं नाही. राज्य उत्पादन मागितलं ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. असा शब्दात आव्हाड यांनी प्रहार केला.

RELATED ARTICLES

भाजपला टेंशन ? शिंदे गटाचा १८ जागांवर दावा ! खासदारांच्या बैठकीत झाले एकमत

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली...

चिठ्ठी आयी है…..पंकज उधास यांचं निधन ! ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं...

रेडिओवरील ‘बहनों और भाईयो’ चा प्रसिद्ध आवाज हरपला !अमीन सयानी यांचे निधन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

भाजप व्यापारी आघाडी प्रदेश समन्वयकपदी हरीश आलिमचंदाणी यांची निवड

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील व्यापार उद्योग क्षेत्रातील विविध समस्या व त्यावरील उपाय योजना लागू करण्यासाठी कार्यरत भारतीय जनता पार्टी व्यापारी...

आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक ! वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी सहभागी होणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता आणि अंतिम निर्णय घेण्याकरता आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित...

Recent Comments

error: Content is protected !!