Thursday, September 19, 2024
Homeताज्या घडामोडीचाहूल लागली ! 'किमान' सोबतच 'कमाल' वाढलं : कडाक्याच्या थंडीपासून सुटका

चाहूल लागली ! ‘किमान’ सोबतच ‘कमाल’ वाढलं : कडाक्याच्या थंडीपासून सुटका

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अकोला शहरात व जिल्ह्यातील थंडीची तीव्रता कमी होत असून, किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या वर चढले आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आणि तिथे बर्फवारी आणि पाऊसही काही ठिकाणी पडत असल्याचा परिणामी महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत होते. त्यामुळे कडाक्याची थंडी पडत होती. ती आता काही अंशी कमी झाली असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. सोमवारी अकोल्यातील किमान तापमान १७ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. दुपारी चांगलेच उन्ह जाणवत आहे.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणे बंद झाले आहे, त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. थंडीची तीव्रता कमी होत असून, किमान तापमान १७ अंश सेल्सिअसच्या वरच राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सकाळी थंडी जाणवत असून, दुपारी मात्र उन्हाचा कडाका आता हळूहळू सुरू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडत होती. ती आता काही अंशी कमी झाली असून, उत्तर भारतात किमान तापमानातही वाढ झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रातील सर्वच भागात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. दुपारी चांगलेच उन्ह जाणवत आहे.राज्यात उत्तरेकडील थंड वारे येत नसल्याने राज्यातील किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर सरकला आहे. गारठाही कमी झाला आहे.

आजपासून राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तर भारतामधील थंडीचा कडाक्यात कमी अधिक प्रमाण होत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड येथे हिमवृष्टी होण्याची शक्यता असल्याने आणि उत्तर भारतामधील राज्यांमध्ये पहाटे दाट धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे कदाचित एक-दोन दिवस तापमान कमी होईल.पण उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!