Friday, October 11, 2024
Homeसामाजिकअकोला शिवसेना (उबाठा) च्या आरोग्य शिबिरात ५२ रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड

अकोला शिवसेना (उबाठा) च्या आरोग्य शिबिरात ५२ रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड


अकोला दिव्य न्युज ब्युरो : गरजू, गोरगरीब जनतेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारणाचा वसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी केले. निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे यांनी गोदावरी फाऊंडेशन जळगांव यांच्या सहकार्याने डाबकी रोड येथील भिरडमंगल कार्यालयात आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे पुजन व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. दाळू गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आरोग्य शिबिराचे महत्व विशद करून आयोजन समितीच्या ८० टक्के समाजकारणाचे तोंडभरून कौतुक केले.

व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, महिला सहसंपर्क प्रमुख जोत्स्ना चोरे, आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, महिला संघटिका देवश्री ठाकरे, योगेश्वर वानखडे, दिलीप बोचे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, संघटक अनिल परचुरे, नितिन ताकवाले, उपजिल्हा संघटिका निलीमा तिजारे, सुनीता श्रीवास, शहर संघटिका मंजुषा शेळके, वर्षा पिसोळे, सिमा मोकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये इसिजी, कार्डीओग्राफ, रक्तदाब तपासणीसह मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशय, स्वादूपिंड, छोट्यागाठी, मुळव्याद, हायड्रोसिल, ह्रदरोग, मेंदुविकार, , गर्भपिशवी विकार तसेच नेत्र,नाक,कान,घसा इत्यादी विविध आजारांचे १९८ रूग्णांची गोदावरी फाऊंडेशनचे डॉ.तुळसीदास पार्टील, असिन तडवी, जितेन्द्र पाटील, योगेश पाटील, डॉ.आश्विनी, डॉ.कालवा, डॉ शुभम, डॉ मृदुला यांनी तपासणी केली व त्यामधील ५२ रुग्णांना ८ फेब्रुवारीपासुन क्रमानुसार शस्त्रक्रिया करीता जळगाव येथे नेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला अमित भिरड, आमले पाटील, तायवाडेकाका, राहूल वानखडे, प्रविण चोपडे, अनिल दाणे, प्रकाश वानखडे, राम चोपडे, अमित सावरकर, अभिषेक खरसाडे, गोपाल बिल्लेवार, अक्षय नागापुरे, गोपाल विखे, मदन चोपडे, नरेंद्र दहिकर, मदन चोपडे, दिपक दाणे, राजेश कानपुरे, संतोष अघडते, राजु शेळके, ऋषीकेश ताथोड, दिपक माठे, किरण ठाकरे किशोर काळणे, संतोष सोनकुचरे, रामेश्वर पवार तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शिबिरार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते, शिबीराचे संचालन तालुकाप्रमुख नितिन ताथोड तर आभार माजी नगरसेविका मंजुषा शेळके यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!