Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याडॉ.संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत...

डॉ.संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थांचा संघाची निवडणूक अविरोध

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सहकार क्षेत्रातील अकोला व वाशिम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थांचा संघ मर्यादित या संस्थेची निवडणूक डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या कुशल नेतृत्वात अविरोध पार पडली. या निवडणूकीमध्ये १३ जागांसाठी तब्बल ३५ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती परंतु डॉ. कोरपे यांच्या समन्वयातून अविरोध झालेल्या या निवडणूकीने सहकारी संस्थांच्या निवडणूक इतिहासातील पथदर्शक ठरली असून, यापुर्वीसुध्दा या संस्थेची निवडणूक अविरोध झाली होती.

या संस्थेकरीता नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी २०२४ रोजी असल्याने निवडणूक प्रक्रिये दरम्यान संस्थेच्या संचालकांच्या १३ पदांसाठी एकुण ३५ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. नामांकन अर्ज मागे घेण्याची वेळ आज बुधवार दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत होती. नामांकना पैकी २२ उमेदवारांनी आपले मतदार संघनिहाय नामांकन अर्ज मागे घेतले. दरम्यान या प्रक्रियेमध्ये डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी समन्वय साधून ही निवडणूक अविरोध होण्याचे लक्ष साध्य केले. संस्थेच्या संचालकांमध्ये डॉ. संतोषकुमार वा. कोरपे, रमेश श्री. हिंगणकर, सुहास भ. तिडके, आ.अमित सु.झनक, राजेश कि.राऊत, जगदिश अ. पाचपोर, दिलीप रा. जाधव, विश्वनाथ कि. ताथोड, अंबादास पुं.तेलगोटे, निळकंठ शा.खेळकर, विठ्ठल पा. चौधरी, सौ. मंदाताई श. इंगोले व सौ. सुलभा कि. शितये यांची अविरोध निवड झाली आहे. सदर संचालकांचा कार्यकाल सन २०२४ ते २०२९ पर्यंत राहील. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी योगेश लोटे यांनी कामकाज पाहीले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!