Saturday, June 22, 2024
Homeसामाजिकनिसर्ग पहाट ! अँड गाडगीळ यांच्या नेतृत्वातील वृक्षभेट व वृक्षारोपण मोहिमेला उस्फूर्त...

निसर्ग पहाट ! अँड गाडगीळ यांच्या नेतृत्वातील वृक्षभेट व वृक्षारोपण मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यात सेंवारत असणाऱ्या निसर्ग पहाट या संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षप्रदान व वृक्षारोपण उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. निसर्ग पहाट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संग्राम गाडगीळ यांच्या मार्गदर्शनात निसर्ग पहाटच्या वतीने महानगरातील विविध महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.

सर्वप्रथम एलआरटी महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षप्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व वृक्षप्रेमींनी मोठा सहभाग घेतला. या सोहळ्यात एलआरटी महाविद्यालयाच्या एचओडी डॉ.‌दमोदर मॅडम तथा अँड. संग्राम गाडगीळ यांनी यावेळी निसर्ग संवर्धनसाठी उपयुक्त असणाऱ्या वृक्षारोपण व वृक्षप्रदान उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सीताबाई कला महाविद्यालयात संपन्न या उपक्रमात अमोल गावंडे व अन्य प्राध्यापकांनी अँड.गाडगीळ यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. दरम्यान आरएलटी महाविद्यालयात देखील हा सोहळा संपन्न झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय नानोटी यांनी अँड.गाडगीळ यांचा हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविला गेला पाहिजे अशी आशा व्यक्त करीत पर्यावरणाची सुरक्षा कशी करावी याबद्दल उपस्थितांना माहिती देत एड गाडगीळ यांनी साकार केलेल्या निसर्ग पहाट या संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमात यावेळी एचओडी बडगुजर, सहाय्यक एचओडी खडसे, चौधरी समवेत विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!