Saturday, June 22, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपला भोपळा फायदा ? तब्बल ९८.१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री शिंदेंना केले नापसंद

भाजपला भोपळा फायदा ? तब्बल ९८.१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री शिंदेंना केले नापसंद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेनेत बंडखोरी घडवून, भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.पण भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील ‘त्या’ बंडाचा आणि एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही प्रकारचा फायदा आजच्या घटकेला मिळत नसल्याचे दिसून येते आहे. कारण महाराष्ट्रातील तब्बल ९८.१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री शिंदेंना केले नापसंद केले असून ही धोक्याची घंटा आहे.

आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजप प्रणित एनडीएला किती आणि इंडिया आघाडी व विरोधकांना किती जागा मिळणार याचे दोन दिवसांपूर्वीच ओपिनिअन पोल आले होते. यातच देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती. यामध्ये ओडिशाचे सीएम नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी आकडेवारी आली आहे.

नवीन पटनायक यांना 52.7 टक्के जनतेने पसंतीचे असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना 46.9% टक्के जनतेने पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आसामचे हिमंत बिस्वा शर्मा 48.6 टक्के मते घेऊन आले आहेत. गुजरातचे सीएम 42.6 टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

यानंतर त्रिपुराचे मानिक साहा, गोव्याचे प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा नंबर लागत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्या दहातही नंबर आलेला नाहीय.

महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपासोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत. शिंदे यांना महाराष्ट्रातून अवघी १.९ टक्के लोकांचीच मते पडली आहेत. शिंदे यांची राज्यात पसंती खूपच कमी झाली आहे, हे यावरून दिसून येत आहे. या यादीत शिंदे यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागत आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!