Friday, April 12, 2024
Home Uncategorized अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेण्याचे नियम बदलले ! जाणून घ्या, नवी...

अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेण्याचे नियम बदलले ! जाणून घ्या, नवी व्यवस्था.

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. यातच आता राम मंदिरात रामलला प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिरात रामललाची सकाळी केली जाणारी मंगला आरती आता पहिल्यांदाच पडदा हटवून सुरु करण्यात आली आहे. ही परंपरा कोणत्याही वैष्णव मंदिरात अस्तित्वात नाही. मात्र, राम मंदिरात आता मंगला आरतीचा लाभ भाविकांनाही घेण्यात येणार आहे. तसेच आरती दर्शन पासची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. १००-१०० जणांना मंगला आरती आणि शयन आरतीसाठी पास दिले जात आहेत. सदर पास ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारात उपलब्ध असणार आहेत. 

रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास शास्त्री यांनी सांगितले की, सर्व वैष्णव मंदिरांमध्ये रामाचा दरबार आहे, ज्यामध्ये लक्ष्मण प्रभू श्रीरामासोबत आहेत. हनुमान आणि माता सीताही सोबत आहेत. काही ठिकाणी सीता माता आणि प्रभू श्रीरामांसह सर्व भावंडे असतात, तर काही ठिकाणी केवळ श्रीराम आणि सीता माता असतात. सीता माता सोबत असल्यामुळे काही मर्यादा येतात. संपूर्ण आरास होईपर्यंत पडदा हटवता येत नाही. परंतु, राम मंदिरात रामलला पाच वर्षांच्या बालकाच्या रूपात विराजमान आहे, येथे सीता माता नाही. त्यामुळे आरास करण्यासंदर्भातील बंधन नाही. या कारणाने राम मंदिर ट्रस्टने मंगला आरतीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, रामलला प्रभूंना विश्रांती मिळत नसल्यामुळे दर्शनाची वेळ बदलण्याचा विचार मंदिर ट्रस्टकडून केला जात होता. रामलला दर्शन काळात बदल लागू होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाचा कालावधी सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि पुन्हा दुपारी १.३० ते रात्री १० असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत दर्शन बंद राहू शकते. या काळात रामलला विश्रांती घेतील, असा दावा केला जात आहे. याबाबत अद्याप स्पष्टता नाही

RELATED ARTICLES

बुलडाण्यात भाऊगर्दी ! डोकेदुखी वाढली : अतिरिक्त बॅलेट युनिट जोडावे लागेल

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात तब्बल २१ उमेदवार मैदानात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे राजकीय पक्ष, मतदारच नव्हे तर निवडणूक विभागाची देखील...

केजरीवाल प्रकरण : अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम ! द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव?

गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे निवडणूक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची देशभर चर्चा होत असताना...

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप, ‘या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

Recent Comments