Thursday, October 10, 2024
Homeराजकारणमाजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर? मुलाकडून काँग्रेस सोडण्याचे संकेत?

माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर? मुलाकडून काँग्रेस सोडण्याचे संकेत?

आगामी लोकसभा निवडणुकीची तयार करत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. निवडणुकीपूर्वी पक्षाला गळती लागली आहे. अनेक मोठ्या काग्रेस नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्षाला रामराम करत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका बसला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आता महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. कारण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, इंडिया टुडेने दावा केला आहे की, कमलनाथ आणि त्यांचे पूत्र नकुलनाथ लवकरच भाजपात प्रवेश करू शकतात.

कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. अशातच नकुलनाथ यांनी त्यांच्या सर्व समाजमाध्यमांवरील प्रोफाईलवरून काँग्रेससंबंधीची माहिती हटवली आहे. या कृतीतून नकुलनाथ यांनी काँग्रेसला रामराम करणार असल्याचे संकेत दिले असल्याची चर्चा मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतेय.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, कमलनाथ यांना त्यांच्या मुलाच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला मध्य प्रदेशात केवळ एकच जागा जिंकता आली होती. कमलनाथ यांनी खूप मेहनत करून छिंदवाडा या मतदारसंघात त्यांचे पूत्र नकुलनाथ यांना जिंकवलं होतं. परंतु, अलीकडच्या काळात या मतदारसंघातील नकुलनाथ आणि कमलनाथ यांची लोकप्रियता घटली आहे. दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात भाजपा गेल्या तीन वर्षांपासून मोर्चेबांधणी करत आहे. त्यामुळे ही जागादेखील काँग्रेसच्या हातून निसटू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.

मध्य प्रदेशचे भाजपा प्रवक्ते आणि कमलनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ आणि नकुलनाथ यांचे फोटो एक्स या मायक्रोप्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तसेच या फोटोंसह ‘जय श्री राम’ असं कॅप्शन दिलं आहे. नकुलनाथ यांनी सोशल मीडिया प्रोफाईलवरून काँग्रेसचा उल्लेख हटवणं आणि नरेंद्र सलुजा यांची पोस्ट पाहून कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या चर्चांवर कमलनाथ किंवा नकुलनाथ यांनी कुठल्याही प्रकारचं अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या तरी या केवळ चर्चा आहेत.कमलनाथ आणि नकुलनाथ काही वेळापूर्वी दिल्लीला रवाना झाले आहेत. तिथे ते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊ शकतात किंवा काँग्रेस पक्षश्रेष्टींकड पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द करू शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!