Saturday, November 9, 2024
HomeUncategorizedजैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निर्वाण ! जैन धर्मीयांवर शोककळा

जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निर्वाण ! जैन धर्मीयांवर शोककळा

जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य विद्यासागरची महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ ला कर्नाटकमध्ये झाला होता.

दिगंबर जैन आचार्य विद्यासागर दार्शनिक साधू होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. मध्यरात्री २.३५ वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले. आज त्यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन करण्यात आलं

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!