Saturday, July 27, 2024
Homeअर्थविषयकBig News ! ईडीकडून हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे

Big News ! ईडीकडून हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : फेमा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे मारले. हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा नियम) उल्लंघन प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेला काही नवीन माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने २२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांची ही कंपनी कंपनी असून ती संकटात सापडली आहे. हिरानंदानी ग्रुपची स्थापना १९७८ साली झाली होती. मुंबई, बंगळुरू, चैन्नई, हैदराबाद येथे हिरानंदानी ग्रुपचे प्रकल्प आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!