Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीनियतीने अखेर डाव साधला; कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचा स्वर्गवास

नियतीने अखेर डाव साधला; कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचा स्वर्गवास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज उपचार दरम्यान मुंबई येथे दुखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्रातील विकासाच्या बाबतीत वेडा माणूस आज हरपला. भाजपा पक्षाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.त्यांच्या या दुःखद घटनेची माहिती देणारा कार्यकर्ता रडतो आहे. ऐकणाराही रडतो आहे. सामान्य माणसाचा आधार हरपला आहे. सर्वसामान्य माणसाचा हित जपणारा, त्याची उन्नती साधण्यासाठी सतत धडपडणारा व्यक्ती आज आपल्यातून निघून गेला.

मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील समस्त जनतेचा मनातील ताईत असणारा दयावान माणूस आज देव झाला. जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकर व सेवक या प्रत्येक घटकांसाठी आपल्या कार्यकाळात अविरत कष्ट करणारा आपल्या जिल्ह्यातील महामानव आज चिरनिद्रेत गेला. अनेक कामावर आपल्या कामाची अमिट छाप उमटविणारा महानायक सगळ्यांना पोरका करून आज आपल्यातून निघून गेला. अत्यंत प्रेमळ सर्वांशी प्रेमाने वागणारा जीवनात चारित्र्य सांभाळणारा धार्मिक संस्काराचे अधिष्ठान असलेला माणूस नव्हे तर प्रत्यक्ष देवदूत म्हणून या जिल्हाभूमीवर आपल्या कर्तुत्वाने नावलौकिक मिळविलेला आपलाच माणूस आज आपल्यातून निघून गेलं आपल्यापासून दूर झाला.

दैदीप्यमान वैभव कीर्ती असतानाही सर्व सामान्य सर्वसामान्य व्यक्तींसोबत वागताना त्यांनी सर्वसामान्य बनूनच आपली भूमिका अदा केली. प्रत्येक व्यक्तीस व्यक्तीस समूहास सतत न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या कामकाजातून दाखविला. मतदार संघातीलजिल्ह्यातीलत्यांच्यासी संपर्कात असणारी जनता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कायमस्वरूपी जाण्याने आधार गेल्याने निराधार झाली आहे. सुख दुखात लोक ज्यांना अधिकाराने हाक द्यायचे व त्या हाकेस तात्काळ हो देणारा आपला हक्काचा माणूस आज आपल्यातून निघून गेला. पाटणी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!