Monday, July 22, 2024
Homeअपघातआयशर -ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी- दोन वाहनांचा अक्षरशः...

आयशर -ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी- दोन वाहनांचा अक्षरशः झाला चुराडा झाला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बुलढाणा जिल्ह्यात परस्पर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार बसून झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर एकाचा रुग्णालयात येत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. वाहनांचा सुसाट अनियंत्रित वेग चालकांचा वाहनांवरचा ताबा सुटणे असंच काहीच या अपघाताबाबत बोलल्या जात आहे.

भरघाव आयशर -ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.राष्ट्रीय महामार्ग ५३वर तालसवाडा फाट्यानजीक आज शुक्रवारी ही घटना घडली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एम.एच.१९/सी.एक्स.०९७७ या क्रमाकाची आयशर गाडी भुसावळवरून अकोल्याकडे निघाली होती. राष्ट्रीय महामार्गावर तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने भरघाव वेगाने एम.पी.१४/एच.सी.३७८६ या क्रमांकाचा ट्रक येत होता. या दोन वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली.अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुराडा झाला. आयशर वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे वय ३२ रा.पतखडी (बेलदार वाडी) जळगाव खान्देश व ट्रकचालक रघुवीर सिंह (वय ३९, पाटणीया मध्यप्रदेश) हे दोघे जागीच ठार झाले.तर अपघाती वाहनांमध्ये अडकलेल्या दोघांना क्रेनने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णालयात गंभीर जखमींवर शर्थीचे उपचार करण्यात आले.मात्र दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुलढाणा व जळगाव खान्देश हलविण्यात आले.त्यापैकी समाधान यमराज पवार (वय ३८ रा.लव्हारा पाचोरा) यांचा बुलढाण्याला नेत असताना दाताळा नजीक मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी रामलाल मिना (वय ४८ रा.पाटलीया मध्यप्रदेश) याला जळगाव खान्देशात हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गाची गत काही दिवसांपासून तालसवाडा ते दसरखेड दरम्यान वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे.त्यामुळे वाहनधारकांच संतुलन बिघडल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!