Monday, July 22, 2024
Homeराजकारणप्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी किशोर मानकर यांची नियुक्ती

प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी किशोर मानकर यांची नियुक्ती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,बांधकाम व्यवसायी व अभियंता,शासनाच्या विज सनियंत्रण समितीचे सदस्य व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय केन्द्रीय उपाध्यक्ष किशोर मानकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्राव्दारे निवड घोषित करून मानकर यांचे अभिनंदन केले.

किशोर मानकर हे सामाजिक क्षेत्रात समाजाभिमुख कार्याने परिचित असून विज संनियंत्रण समितीच्या माध्यमातून त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विजक्षेत्रातील अडचणी सोडविण्याचे प्रभावी कार्य केलेले आहे. आध्यात्मिक,सामाजिक आणि “विदर्भ उडान” या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक म्हणून ते पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे समाजसेवी पत्रकार म्हणूनही परिचित आहेत.

त्यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर,माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ.अशोक ओळंबे,भाजप नेते राजू टाकळकर, ज्येष्ठ नेते पंडितराव कुळकर्णी यांना दिले आहे.त्यांच्या नियुक्ती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, मित्रमंडळी आणि सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!