Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीबुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक बुलढाण्यात भाजपचे उमेदवार ? चांडक यांचा दुजोरा

बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक बुलढाण्यात भाजपचे उमेदवार ? चांडक यांचा दुजोरा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजप महायुतीमध्ये वादंगाचा विषय ठरलेल्या बुलढाणा लोकसभा पक्षीय उमेदवारांबरोबरच भाजपकडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या रूपाने तगडा उमेदवार असल्याची चर्चा वेगाने पसरली. यासंदर्भात विचारणा केली असता दस्तुरखुद्द चांडक यांनी याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे काल सोमवार ११ मार्चला बुलढाणा येथे चांडक यांनी आपल्या विश्वासू आणि बुलडाणा अर्बन परिवारातील मोजक्या सहका-यांसोबत गहन चर्चा केली आहे. त्यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांच्या गृहक्षेत्रात भाजपकडून जंगी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे भाजपा बुलढाण्यासाठी किती आग्रही आहे आणि अंतिम क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करणार हे स्पष्ट झाले.

निवडणूक आचारसंहितेचा मुहूर्त नजीक आल्यावरही बुलढाणा मतदारसंघातील जागा वाटप आणि उमेदवारीचा राजकीय तिढा कायम आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही हा तिढा कायम आहे. दुसरीकडे भाजपच्या मतदारसंघातील आढावा बैठकांचा धडाका कायम आहे. घाटावरील सहा तालुक्याच्या मेहकर येथील बैठकीत लोकसभा प्रमुख विजयराज शिंदेसह कार्यकर्त्यांनी बुलढाणा भाजपकडे घेण्याची जोरदार मागणी केली आहे.

सहकार क्षेत्रात बुलढाण्याचे नाव देशपातळीवर नेणारे राधेश्याम चांडक हे देखील बुलढाण्यातून लढण्यास तयार असल्याची चर्चा आज रंगली. यासंदर्भात थेट चांडक यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. “आपण भाजपकडे उमेदवारी मागणार नाही, पण पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच लढणार”, असे चांडक यांनी स्पष्ट केले. भाजपचा विकासाचा मुद्दा लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. मागील काळात (एकसंघ) राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होतो. पण मागील अनेक महिन्यांपासून त्या पक्षापासून अंतरावर असल्याचे ते म्हणाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील बंडखोरी नंतर चांडक यांची बदलेली भुमिका व आमदार संजय कुटे यांच्यासोबत असलेला घरोबा लक्षात घेता, भाजपसाठी चांडक हे ट्रम्प कार्ड आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!