Tuesday, October 22, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यातील मालमत्ता कर वसूलीचा ठेका रद्द करा अन्यथा...वंचित बहुजन आघाडीचा इशारा

अकोल्यातील मालमत्ता कर वसूलीचा ठेका रद्द करा अन्यथा…वंचित बहुजन आघाडीचा इशारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबई येथील पाच दिवसीय धरणे आंदोलनात राज्याच्या अवर सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ सुनील लहाने यांना मालमत्ता कर वसूली संदर्भात अभ्यास करून ठरवु असे सकारात्मक चर्चा केली. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी चर्चेदरम्यान मालमत्ता कर हा कसा चुकीचा असून चुकीच्या पध्दतीने आकारल्या जातोय, असं सांगून दोन दिवसांच्या आत मालमत्ता कर वसूलीचा ठेका रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे मजहर खान, शंकरराव इंगळे,किरणताई बोराखडे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी डॉ सुनील लहाने यांचे अकोला महापालिका आयुक्तपदी रुजु झाल्याबाबत पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

मनपा आयुक्तांच्या दालनात यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, पश्चिम महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, निलेशभाऊ देव, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, महासचिव गजानन गवई, माजी नगरसेवक किरण बोराखडे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जि प सदस्य योगेश वडाळ, सुवर्णा जाधव, ज्योतीताई खिल्लारे, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!