Friday, April 12, 2024
Home ताज्या बातम्या अकोल्यात अभय योजना लागू ! स्वाती इंडस्ट्रीची चौकशी करणार : वंचितच्या आंदोलनाला...

अकोल्यात अभय योजना लागू ! स्वाती इंडस्ट्रीची चौकशी करणार : वंचितच्या आंदोलनाला यश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील मालमत्ता कर वसूलीचा स्वाती इंडस्ट्रीजला कंत्राट देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देत मनपा आयुक्त लहाने यांनी शहरातील मालमत्ताधारकांसाठी अभय योजना तात्काळ लागू करण्यात आली असल्याचे जाहीर केले.यामुळे अकोल्यात सुरू असलेल्या अवैध टॅक्स वसुली संदर्भात वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात यश मिळाले.

प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज अकोला शहरात 36 केंद्रावर स्वाक्षरी मोहीम तसेच एक मिस कॉल योजना राबविण्यात आली होती, या आंदोलनाला अकोलेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. जवळपास एक लाखापेक्षा अधिक स्वाक्षऱ्या आणि एक लाख तीस हजार मिस्कॉल द्वारे सहभाग नोंदवून अकोलेकरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मनपा आयुक्त लहाने यांनी या आंदोलनाची दखल घेत शास्ती अभय योजना आजच लागू केल्याची माहिती वंचितच्या शिष्टमंडळाला दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, निलेश देव, शंकरराव इंगळे, अरुंधती शिरसाठ, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सुनील लहाने यांची आंदोलन झाल्यानंतर भेट घेतली. त्यांना एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन स्वाधीन केले.

अकोल्यातील जनेतेने भाजप नेत्यांना, आमदारांना, नगरसेवकांना काही बेसिक प्रश्न विचारावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले होते. टॅक्स वसुलीचे काम स्वाती इंडस्ट्रीजलाच का दिले. भाजप विरोध का करीत नाही ? सामान्य जनतेने महानगरपालिकेत 100 रुपये भरल्यानंतर त्यापैकी 8 रुपये 39 पैसे कंत्राटदाराच्या घशात का घालत आहेत ? थेट टॅक्स भरणाऱ्या 50 टक्के अकोलेकरांना दहा टक्के सूट का नाही, ? स्वाती इंडस्ट्रीज मध्ये भाजपचे कोणते नेते भागीदार आहेत, तत्कालीन पालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे प्रशासक पदाचा पदभार असताना त्यांनी कर वसुलीचे खाजगीकरण करत 1500 कोटीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजला देताना भाजपने का विरोध केला नाही, जास्तीचा मालमत्ता कर थोपवून भाजप सत्ता काळात अकोलेकरांची लूट का करीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोल्यातच खाजगीकरण का केले. त्यांनी मुंबई ठाण्यात खाजगीकरण का केले नाही, टॅक्स वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रीजचे कर्मचारी घरात घुसून दमदाटी करत आहेत. त्याबद्दल भाजपचे नेते गप्प का असे अनेक प्रश्न वंचित बहुजन आघाडीतर्फे विचारण्यात आले.

एक लाख सह्यांचे निवेदन आयुक्तांना दिल्यानंतर त्याची दुय्यम प्रत मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठविण्यात आली. मनपा मुख्यद्वारासमोर झालेल्या आंदोलनामध्ये राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, प्रभाताई शिरसाट, मिलिंद इंगळे, मजहर खान, वंदनाताई वासनिक,जि.प अध्यक्ष संगीता अढाऊ, प्रा.संतोष हुशे, जि.प उपाध्यक्ष सुनिल फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, पुष्पाताई इंगळे, किरणताई बोराखडे, गजानन गवई, सीमांत तायडे, मनोहर बनसोड, अँड नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, विकास सदांशिव, पराग गवई, प्रदीप चोरे, बबलु पातोडे, बुध्दरत्न इंगोले, सरलाताई मेश्राम, किशोर मानवटकर, कुणाल राऊत, मनोहर पंजवाणी, महेंद्र डोंगरे, मनोज शिरसाट, पुरषोत्तम वानखडे, गुरूदेव पळसपगार, सुनिल शिराळे,जय तायडे,वैभव खडसे, नागेश उमाळे, राजेश मोरे, आकाश भगत, आकाश गवई, पप्पू मोरे, ज्योती खिल्लारे, सुरेश मोरे, मायाताई इंगळे, आशिष मांगुळकर, महेश शर्मा, सुरेश कलोरे, मंदाताई शिरसाट, नितेश किर्तक, भाऊसाहेब थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

Recent Comments