Saturday, July 27, 2024
Homeराजकारणभाजपचे मुंबईत दोन्ही उमेदवार गुजराती ! २० जणांच्या यादीत नऊ मराठा चेहरे

भाजपचे मुंबईत दोन्ही उमेदवार गुजराती ! २० जणांच्या यादीत नऊ मराठा चेहरे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनं ५ विद्यमान खासदारांची तिकिटं कापली आहेत. पैकी २ खासदार मुंबईचे आहेत. विशेष म्हणजे भाजपनं मुंबईतील २ मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांची तिकिटं कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा सामना करण्यासाठी भाजपनं भाकरी फिरवली आहे.

मुंबई शहर ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरे मुंबईतील ताकद कायम ठेवून आहेत. मुंबईत ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे इथे शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा मुकाबला झाल्यास त्याचा फायदा ठाकरेंना होईल. महायुतीच्या जागा कमी होतील. त्यामुळेच शिंदेंना मुंबईत फारशा जागा सोडायच्या नाहीत, असा प्लान भाजपनं आखला आहे.

मुंबईत ठाकरे विरुद्ध भाजप ‘सामना’
मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झाल्यास त्याचा फायदा ठाकरे घेतील. सहानुभूतीच्या आधारे ते कमबॅक करतील अशी भीती भाजपला आहे. ठाकरेंनी लोकसभेला मुसंडी मारल्यास त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत, मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. त्यामुळे मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

नव्यांना भाव, भाजपचा डाव
मुंबईत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन प्रस्थापितांविरोधात असलेली मतदारांची नाराजी दूर करण्याचा भाजपची योजना आहे. त्यामुळेच उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजनदेखील डेंजर झोनमध्ये आहेत. त्यांच्या जागी आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. तसं झाल्यास मुंबईत सगळ्याच भाजप खासदारांचा पत्ता कापला जाईल. ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात भाजपचे नवे चेहरे असतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!