Thursday, December 12, 2024
Homeसंपादकियये गारंटी है ! 30 कंपन्या अशा आहेत, ज्यांनी छापेमारी नंतर कोट्यावधीचा...

ये गारंटी है ! 30 कंपन्या अशा आहेत, ज्यांनी छापेमारी नंतर कोट्यावधीचा निवडणूक फंड दिला

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : ‘ना खाऊंगा, ना खानें दुंगा’ या आणि या सारख्या टॅग लाईन नंतर अलिकडच्या दिवसात ‘ये मोदी की गांरटी’ हे हॅश लावणारे भाजपाचे सर्वेसर्वा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा आणि हेतु ‘निवडणूक रोखे’ म्हणजे इलेक्शन बॉण्ड मधून उघड पडला आहे. हे जळजळीत सत्य केवळ देशाच्या सर्वोच्च न्यायालयामुळे उघडकीस आले आहे. तरीही मोदींचे बगलबच्चे असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व त्यांची पिलावळ हा देशातील सुनियोजित महा भ्रष्टाचार लपविण्यासाठी कशोशीने प्रयत्न करीत आहेत. कोणत्या कंपनी वा व्यक्तिने, कोणत्या राजकीय पक्षाला किती निवडणूक फंड दिला, ही माहिती देणारे ‘यूनिक अल्फा-न्यूमेरिक कोड’ निवडणूक आयोगाला सादर केले नाही.पण सर्वोच्च न्यायालयाने ‘यूनिक अल्फा – न्यूमेरिक कोड’ चा खुलासा का केला नाही? हा महत्त्वाचा प्रश्न करून येत्या सोमवार दिनांक १८ मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ही माहिती का दडविली ?कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत ? आज ना उद्या हे उघडकीस येईल, मात्र आतापर्यंत सुप्रीम कोर्टातून समोर आलेल्या माहितीने पंतप्रधान मोदी यांचा भ्रष्टाचार विरोधीतील लढा आणि ‘सबका साथ सबका विकास’ निखालस खोटा आहे, पण भक्त आणि आंधळे समर्थक ‘कबूल” करणारं नाही. ही गारंटी आहे.असो !

निवडणूक देणग्याना घेऊन समोर येत असलेल्या माहितीने ‘कथनी आणि करनी’ मधील अंतर स्पष्ट झाले आहे.कोलकाता येथील मदनलाल लिमिटेड या कंपनीने 2019 में लोकसभा निवडणुकीपूर्वी

दोन वेळा 182.5 कोटी रुपयांचे बॉण्ड खरेदी केले. जेव्हा की या काळात या कंपनीचा शुद्ध नफा फक्त 1.81 रुपये होता. 2020-21 या वर्षात ही नफा 2.72 कोटी रुपये होता. 2022- 23 मध्ये हा नफा फक्त 44 लाख रुपये होता. हे एक उदाहरण असून अशाच अनेक कंपन्यांनी आपल्या शुध्द नफ्यापेक्षा जास्त देणग्या दिल्या आहेत.एवढेच नव्हे तर सर्वात जास्त देणग्या देणा-या 30 कंपन्यांपैकी 14 कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर केंद्रीय किंवा राज्यातील तपास यंत्रणांनी कारवाई केल. सर्व मिळून असे एकूण 30 उद्योगसमूह आहेत की ज्यांनी छापेमारी नंतर कोट्यावधी रुपयांचे निवडणुकी बॉण्ड खरेदी केले. डीएलएफ कमर्शियलने 30 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.पण जानेवारी 2019 मध्ये जमीन आवंटनातील अनियमिततेमुळे सीबीआयने या कंपनीवर छापा टाकला होता. पुढील तक्त्यात विस्तृत माहिती आहे

कंपनी. कारवाई कधी झाली बॉण्ड खरेदी कधी

फ्यूचर गेमिंग. 2 एप्रिल 2022 ला छापा. 7 एप्रिल 2022

अरबिंदो फार्मा. 10 नोव्हेंबरला अटक. 15 नोव्हेंबर 22

शिर्डी साई इले. 20 डिसेंबर 23 ला छापा. 11जानेवारी 24

टोरेंट पावर. 20 डिसेंबर 23 ला छापा. 10 जानेवारी 24

डॉ. रेड्डीज. मार्च 24 को प्रोजेक्ट मिळाले. 17 नोव्हेंबर 23

कल्पतरू प्रो. 13 नोव्हेंबर 2023 ला छापा. 10 आक्टोंबर 23

माइक्रो लैब्स. 4 आगस्ट 2023 ला छापा. 10 आक्टोंबर 22

हीरो मोटोकॉर्प. 14 जुलै 2022 ला छापा. 7 आक्टोंबर 22

एपको इंफ्रा. 31 मार्च 2022 ला छापा 10 जानेवारी 22

यशोदा हॉस्पिटल. 24 जानेवारीला टेंडर मिळाले. 21-अक्टो 23

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!